esakal | ग्रामपंचायतसाठी इच्छुकांची सेटिंग, ग्रामीण भागात वातावरण तापले; गाठीभेटी ना सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Setting of aspirants for Gram Panchayat, hot weather in rural areas; The beginning of the meeting

तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची मुदत संपून गेल्यावरही कोरोनामुळे निवडणूक होऊ शकले नाही. लोकप्रतिनिधी पेक्षा प्रशासकामार्फत कारभार सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका विषय कार्यक्रम घोषित झाला असून निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून निवडणुका असलेल्या गावातील वातावरण चांगले तापले आहे.

ग्रामपंचायतसाठी इच्छुकांची सेटिंग, ग्रामीण भागात वातावरण तापले; गाठीभेटी ना सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) ः तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची मुदत संपून गेल्यावरही कोरोनामुळे निवडणूक होऊ शकले नाही. लोकप्रतिनिधी पेक्षा प्रशासकामार्फत कारभार सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका विषय कार्यक्रम घोषित झाला असून निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून निवडणुका असलेल्या गावातील वातावरण चांगले तापले आहे.


तेल्हारा तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय कार्य वाहीला सुरुवात झाली. तालुक्यातील हिवरखेड, कारला बुद्रुक, सौंदाळा, गोर्धा, हिंगणी बुद्रुक, दानापूर, खंडाळा, अडगाव बुद्रुक, शिवाजीनगर, शिरसोली, अटकळी, चांगलवाडी, रायखेड, बेलखेड, वरुड बुद्रुक, घोडेगाव, राणेगाव, जस्तगाव, भांबेरी, थार, तुदगाव, वाकोडी, इसापूर, वाडी अडमपूर, वडगाव रोठे, मनब्दा, खेलदेशपांडे, वांगरगाव, तळेगाव वडनेर, अडसूळ, खेलसटवाजी, नरसिपूर, नेर व पिवंदळ खुर्द या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.

यातील काही ग्रामपंचायती भाजप ते काही काँग्रेस, राष्ट्रवादी तर काही वंचित बहुजन कडे आहेत. त्यातच सरपंच पदाचे आरक्षण रखडल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तरी या निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, उमेदवारी साठी सेटिंग सुरू केले आहे.

पॅनल उभे करणारे कोणाच्या मागे किती मते आहेत याचा हिशेब करून उमेदवार ठरवत आहेत पॅनल मिळाले तर ठीक नाहीतर स्वतंत्र उमेदवारी घेऊन नशीब अजमावे आपण खूपच लोक प्रिय आहोत या भ्रमात असणारे देखील कमी नाहीत.

(संपादन - विवेक मेतकर)