सातव्या आर्थिक गणनेला उद्यापासून सुरूवात

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 25 November 2020

जिल्ह्यामध्ये २६ नोव्हेंबर २०१९ पासून सातव्या आर्थिक गणनाचे काम सामाजिक सेवा केंद्राचे प्रगणक घरोघरी जावून करणार आहेत. त्यासाठी सामाजिक सेवा केंद्राद्वारे ८५९ प्रगणक व २१९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला   ः जिल्ह्यामध्ये २६ नोव्हेंबर २०१९ पासून सातव्या आर्थिक गणनाचे काम सामाजिक सेवा केंद्राचे प्रगणक घरोघरी जावून करणार आहेत. त्यासाठी सामाजिक सेवा केंद्राद्वारे ८५९ प्रगणक व २१९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वांना ओळखपत्र देण्यात आले असून अशा ओळखपत्रधारक प्रगणकांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

सदर आर्थिक गणनेचा उपयोग देशाच्या सर्वागीण विकासासाठी व नवीन योजना अंमलात आणण्यासाठी होणार आहे. आर्थिक बाबीचे नियोजनाच्या दृष्टीने आर्थिक गणना महत्वाची असल्यामुळे हे काम राष्ट्रीय काम समजून नागरिकांनी सहकार्य करावे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

प्रगणकांना दिलेले माहिती ही पूर्णतः गोपणीय राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता प्रगणकांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी बी.आर. मोहोड व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Seventh economic census from tomorrow