शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याने टॅक्स न भरलन्याने गमावले पद

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

शिवसेनेच्या व्याळा सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य वर्षा गजानन वझिरे यांना ग्रामपंचायतचा पाणीपट्टी व मालमत्ता कर निवडणुकीपूर्वी न भरणे महागात पडले आहे. विभागीय आयुक्तांनी या कारणास्तव त्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे.
 

अकोला  ः शिवसेनेच्या व्याळा सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य वर्षा गजानन वझिरे यांना ग्रामपंचायतचा पाणीपट्टी व मालमत्ता कर निवडणुकीपूर्वी न भरणे महागात पडले आहे. विभागीय आयुक्तांनी या कारणास्तव त्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे.

व्याळा येथील रहिवाशी श्रीकृष्ण विठ्ठलल पागधुने यांनी विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

या याचिकेत जि. प. सदस्य म्हणून निवडून आलेल्या वर्षा वझिरे यांनी निवडून येण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजे २३ डिसेंबर २०१९ पर्यंत संयुक्त हिंदू कुटुंबाचा कर म्हणजे व्याळा ग्रामपंचायतचा मालमत्ता कर १० हजार ८७१ रुपयांचा भरणा ग्रामपंयातीकडे केला नाही.

हेही वाचा - धरणाचं पाणी पेटतंय, वानच्या पाण्याची पळवा-पळवी न थांबल्यास धरणावर आंदोलन

असे असतानाही निवडणूक अर्जासोबत घोषणापत्र कलम १६ मधील तरतुदीनुसार अपात्र नसल्याबाबत नमुद केले होते. याबाबत अर्जदार पागधुने यांनी दाखल केलेल्या अर्जावर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली.

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

त्यात सादर करण्यात आलेले दस्तऐवज व पुराव्यांवरून वर्षा वझिरे या अपात्र असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पागधुने यांचा अर्ज मान्य करीत वझिरे यांना जि.प. सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे. अर्जदाराची बाजू ॲड. संतोष रहाटे यांनी मांडली तर गैरअर्जदारातर्फे ॲड. अभय थोरात यांनी काम बघितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: ShivSena ZP. Member Varsha Wazir ineligible