esakal | होस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सहा मुलींनी केले सिनेस्टाईल पलायन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Six girls wearing sari on the second floor of the hostel escaped cinestyle

शासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी रात्रीच्या सुमारास सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना खदान पलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

होस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सहा मुलींनी केले सिनेस्टाईल पलायन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः शासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी रात्रीच्या सुमारास सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना खदान पलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.


शहरातील खडकी परिसरात महिला व बाल विकास विभागाचे शासकीय जागृती महिला राजगृह आहे. या ठिकाणी हरवलेल्या व ज्यांना पारिवारिक आधार नाही अशा मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. याच ठिकाणी राहणाऱ्या अंदाजे १८ ते २४ वयोगटातील ६ मुलींनी १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजताच्या दरम्यान पलायन केले.

विशेष म्हणजे या सहा ही मुलींनी शासकीय जागृती महिला राजगृहच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सिनेस्टाईल पलायन केल्याचे समजते.

या प्रकाराबाबत शासकीय जागृती महिला राजगृह येथील अधीक्षकांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून खदान पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. 

चार मुली खामगावला सापडल्या
शासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी सिनेस्टाईल पलायन केले. त्यापैकी चार मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु दोन मुली अद्याप मिळाल्या नसल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)