शस्त्रांचा कारखाना, घरातच तयार केल्या धारदार तलवारी, रामपूरी चाकू अन् पोलिसांनी टाकला छापा

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 17 October 2020

पोलिस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथकाने ता. १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रामदासपेठ परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गस्तीवर होते.

अकोला :  पोलिस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथकाने ता. १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रामदासपेठ परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गस्तीवर होते. 

 फिरदोस कॉलनी गवळीपूरा अकोला येथे अवैध शस्त्र तयार केले जात असल्याची माहिती मिळाली आन् लगेच धाड टाकली.

त्यावेळी अब्दुल इमराण हा त्याचे घरात अवैद्य शस्त्र तलवार, रामपूरी चाकू हे विक्रीकरिता तयार करीत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या घरी जावून पहिल्या माळ्यावर छापा टाकला.

त्याठिकाणी अवैधरित्या शस्त्र (तलार) मशीनव्दारे तयार करताना आरोपी इमराण आढळून आला. त्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरातून स्टीलच्या एकूण तीन धारदार तलवारी तलावरी, लोखंडी पात्याच्या एकूण ७ तलवारी, एक लोखंडी रामपूरी चाकू, पांढऱ्या धातूचे टोकदार पाते, पृष्ठावर बनलेली तलवारची डिझाईन, एक प्लॉस्टिकमधील चाकूची डिझाईन, दोन लाकडी मुठा, मोजमापाची स्टील पट्टी, एक लोखंडी पेन्चीस, दोन लोखंडी हातोड्या,

लोखंडी सांडस, लोखंडी जंबुरा, कानस, दोन लोखंडी पोगर, एक लोखंडी छन्नी, एक लोखंडी पाना, दोन वापरते काळ्या फेमचे चष्मे, दोन लोखंडी हातपकड, हॅन्ड गाईन्डर मशीन, लोखंडी कटर मशीन, ड्रिल मशीन बीटसह , एक लोखंडी पांढऱ्या धातुची पट्टी, एक स्टील पाईप, असा एकूण ४१,४१०/-रुपयांचा अवैद्यशस्त्र तसेच शस्त्र बनविण्याचे उपयोगी येणारे साहित्य आढळून आले.

आरोपी इमराणविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक मिलिंदकूमार अ.बहाकर व त्यांच्या विशेष पथकाने केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Arms factory, home-made sharp swords, Rampuri knife and police raid