esakal | रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये सहा पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Six positive in Rapid Antigen Test

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात बुधवारी दिवसभरात झालेल्या १४७ चाचण्या झाल्या. त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये सहा पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात बुधवारी दिवसभरात झालेल्या १४७ चाचण्या झाल्या. त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


अकोला ग्रामीण येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट येथे नऊ चाचण्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेल्हारा येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. ५० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. वैद्यकीय महाविद्यालय येथे ४९ चाचण्या झाल्या.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हेडगेवार लॅब येथे २० चाचण्या झाल्या. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. असे दिवसभरात १४७ चाचण्यांमध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजपर्यंत २४६१५ चाचण्या झाल्या त्यात १७३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image