esakal | बारावी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास आजपासून प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Starting from today to fill the application form for the 12th examination at Buldana

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2021 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया (ता.15) मंगळवार रोजी पासून सुरू होत आहे.तरी बारावी मधील प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी आपल्या विद्यालयातील संबंधित प्राध्यापकांना भेटून आपले ऑनलाइन आवेदनपत्र भरावे.

बारावी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास आजपासून प्रारंभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

चांडोळ (जि.बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2021 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया (ता.15) मंगळवार रोजी पासून सुरू होत आहे.तरी बारावी मधील प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी आपल्या विद्यालयातील संबंधित प्राध्यापकांना भेटून आपले ऑनलाइन आवेदनपत्र भरावे.


कोरोना विषाणूमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षाचे नियोजन विस्कळित झाले होते,तर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.आता ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी सुरवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामाफत सन 2021 मध्ये घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स, दहावी मार्कशिटची झेरॉक्स, दहावी पास लिव्हिंग सर्टिफिकेट झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, चार पासपोर्ट साईज आकाराचे कलर फोटो असे कागदपत्रे लागणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image