
रेसिंग बाईक चालकांना अचानक वळण घेताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. यावर उपाय म्हणून अमरावती येथील दोन शास्त्रज्ञांनी उपाय शोधला असून, त्यांच्या या संशोधनाला केंद्र शासनाने पेटन्टही दिले आहे.
अकोला : रेसिंग बाईक चालकांना अचानक वळण घेताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. यावर उपाय म्हणून अमरावती येथील दोन शास्त्रज्ञांनी उपाय शोधला असून, त्यांच्या या संशोधनाला केंद्र शासनाने पेटन्टही दिले आहे.
अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. गिरीष पी. देशमुख आणि प्रा. पीयूष अशोकराव डालके यांनी रेसिंग बाईकला टर्निंग इफेक्ट देणारे संशोधन केले आहे.
‘क्वॉड बाईक डिफरेन्टल’ या नावाने डिझाईन संशोधन करून ते मान्यतेसाठी या दोन्ही संशोधकांना शासनाकडे सादर केले होते. या संशोधनामुळे डोंगराळ भागात किंवा वळण रस्त्यावर होणारे रेसिंग बाईकचे अपघाताचे प्रमाण कमी करता येईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
‘आऊटपुट शाफ्ट बेल्ट ड्राईव्ह’ हे वाहन वळण घेताना भिन्न प्रकारे यंत्रातील भाग एकाच वेळी योग्यप्रकारे कसे काम करू शकतील याबाबत शोध घेण्यात आला. रेसिंग बाईकची कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने हे यंत्र नव्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले.
त्यामुळे इंजिनाला वळण रस्त्यावर पॉवर देताना बेल्ट व गेअर बॉक्सला कमीत कमी अंशामध्ये फिरवून बदलणे शक्य होणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात या संशोधनामुळे मोटार बाईक रेसिंगमधील अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठी उपलब्धी मिळविली आहे.
त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली असून, या शोधाला पेटनन्टही मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात वाहनांची कार्यक्षमता वाढून अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण कमी करणे शक्य होईल,असा दावा केला केला जात आहे.
रेसिंगमध्ये बाईकचा अपघात ही मोठी समस्या होती. त्यावर संशोधन करून यंत्राचे वेगळे डिझाईन तयार करण्यासाठी आम्ही दोघांनीही प्रयत्न केले. आम्ही सादर केलेल्या डिझाईनला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
- प्रा. पीयूष अशोकराव डालके, अभियांत्रिक संशोधक, अमरावती
(संपादन - विवेक मेतकर)