कापूस घ्या, नाहीतं मरू द्या!, कापूस खरेदीपासून वंचित शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

Akola News Take cotton, dont let it die !, Farmers deprived of cotton purchase warn of self-immolation
Akola News Take cotton, dont let it die !, Farmers deprived of cotton purchase warn of self-immolation

बुलडाणा  : मोताळा तालुक्यातील शिरवा येथील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत आमचा कापूस खरेदी करा, नाहीत आम्हाला करू द्या, अशी मागणी केली आहे. या तक्रारीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.


या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील शिरवा येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी टोकन देताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. टोकन वाटपात जाणीवपूर्वक कापूस विक्रीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. कापूस घरातच पडून असल्याने उपासमारीची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली होती.

या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती नेमून १५ दिवसाच्या आत अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र चौकशीचे आदेश देवूनही अधिकाऱ्यांनी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कोणतीही चौकशी केली नसल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आम्हाला कापूस खरेदी पासून वंचित ठेवल्याने संपूर्ण कुटुंबाचे सदस्य मानसिक तणावामध्ये आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. शेतीतील कापसाचे उत्पन्नावर आमचे उपजिविका अवलंबून आहे. त्यामुळे आमच्या कापसाची खरेदी न केल्याने आमच्या कुटुंबाचे हाल होत आहेत. कोरोना महामारी संकटाच्या काळात एकीकडे होरपळ सुरू असताना दुसरीकडे कापसाची शासकीय खरेदी होत नाही.

खरेदीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. हा हलगर्जीपणा खपवून न घेता कापूस खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. एक आठवड्याच्या आत आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापसाला सामूहिक आग लावून त्यामध्ये आत्मदहन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यामध्ये अवचितराव जुनारे, श्रीकृष्ण जुनारे, श्रावण दिवाने, संतोष दिवाने, श्रीराम दिवाने, रामेश्वर जुनारे, भीमराव दिवाने, गजानन सोनवणे व समाधान धुरंदर या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याअंतर्गत सीसीआयकडून खुलासा मागविला आहे. तो अद्याप मिळाला नाही. मनुष्यबळ देखील कमी आहे. इतर चौकशी सुरू आहे. खुलासा आल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी संदर्भातील निर्णय होऊ शकतो.
-महेश कृपलानी, प्रभारी जिल्हा उपनिबंधक तथा चौकशी अधिकारी
(संपादन- विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com