esakal | दारूबंदीसाठी महिला धडकल्या थेट पोलिस ठाण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Tamshi women hit the police station directly for banning alcohol

तालुक्यातील तामशी गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारुची अवैध विक्री सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी महीलांसह बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती धनंजय दांदळे यांनी ठाणेदारांना निवेदन दिले आहे.

दारूबंदीसाठी महिला धडकल्या थेट पोलिस ठाण्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बाळापूर (जि.अकोला) : तालुक्यातील तामशी गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारुची अवैध विक्री सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे.

वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी महीलांसह बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती धनंजय दांदळे यांनी ठाणेदारांना निवेदन दिले आहे.


बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या तामशी येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावठी व देशी दारू खुलेआम विकली जात आहे. या धंद्यांना गावात ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे.

तसेच विद्यार्थी व तरुणाई देखील दारुच्या व्यसनाला बळी पडत आहेत. या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील महिला पोलीस ठाण्यात आल्या. ‘आमच्या येथील दारूविक्री बंद करा’ अशी मागणी यावेळी पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांना निवेदनातून करण्यात आली. गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे गावामधील शांतता भंग होऊन गरीब व मध्यमवर्गीयांचे संसाराचा आर्थिक बजेट विस्कळीत होउन महिलांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे.

सदर अवैध दारू विक्री वर प्रतिबंध करून अवैध दारू विक्रीची पाळेमुळे शोधून संबंधितांना कडक शासन करून कारवाई व्हावी. असे या निवेदनात म्हटले आहे. तर वाडेगांव येथून दारुचा पुरवठा तामशी गावात केल्या जात आहे.

या विक्रीला पायबंद करण्यात यावे अशी मागणी विजय पातोडे, सागर पातोडे, मुकुंद पातोडे यांच्या सह गंगाबाई पातोडे, किर्ती पातोडे, शांताबाई पातोडे, वच्छला पातोडे, शिला पातोडे, कांताबाई पातोडे, बेबीताई पातोडे, कामेनाबाई पातोडे, अन्नपूर्णा पातोडे, मायाताई पातोडे, ज्योती पातोडे यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image