पीक वाचविण्यासाठी टँँकरने रस्त्यावर पाणी

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

अडसूळ ते तेल्हारा या १५ किलोमीटर रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे उडणाऱ्या धुळीने शेतीचे प्रंचड नुकसान होत होते.

तेल्हारा (जि.अकोला)  ः अडसूळ ते तेल्हारा या १५ किलोमीटर रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे उडणाऱ्या धुळीने शेतीचे प्रंचड नुकसान होत होते.

शेती वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन करून धुळ उडणार नाही यासाठी टँँकरची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत कंत्राटदार कंपनीने टँँकरची व्यवस्था केली असून, रोडवर पाणी टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

तेल्हारा ते अडसूळ रोडचे काम सुरू गेले २५ दिवसांपासून सुरू आहे. हा रोड खोदल्यानंतर त्यावर एक दिवस सुध्दा पाणी टाकण्यात आले नाही. त्यामुळे धुळी उडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या तूर, हरबरा, फळबाग या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुसकान होत होते.

हेही वाचा -  ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

या बाबत शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा यांना लेखी तक्रार दिली. शेतकऱ्याची शेकडो एकर जमीन धुळीपासून वाचविण्यासाठी १५ किलोमीटर एरियासाठी कंपनीसोबत चर्चा करून एका टँकरची व्यवस्था करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पुढाकार घेतला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Tanker water on road to save crop at Telhara