esakal | सावधान, लक्ष्मीपूजनातही असू शकतात नकली नोटा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: There may be fake notes in Lakshmi Pujan too

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनातीह तुमच्याकडून या नकली नोटा पूजनात ठेवल्या गेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सावधान, लक्ष्मीपूजनातही असू शकतात नकली नोटा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :दिवाळी बाजारीतील गर्दचा फायदा घेवून काही समाजकंटकांकडून नकली नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नकली नोटांचा धोका वाढला आहे. ही बाबत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट येथे केलेल्या कारवाईने उघड झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनातीह तुमच्याकडून या नकली नोटा पूजनात ठेवल्या गेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 


स्थानिक गुन्हे शाखेला एक इसम हा अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केटमध्ये बनावट चलनी नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे तपास पथकाने सापळा रचून आरोपी अबरार खान हयात खान (वय २७ वर्ष रा. नायगाव) यास ५०० रुपयांच्या छापील किंमतीच्या बनावट चलनी नोटा बाळगून त्या परिसरातील दुकानात चालविण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेतले.

त्याचेकडून तीन बनावट चलनी नोटा जप्त केल्यात. त्या घरून ५४ बनावट चलनी नोटा आढळून आल्यात.


नोटांचे बुलडाणा कनेक्शन
अबरार खान हयात खान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून नकली नोटा त्याचे जानोरी, शेगाव, जि. बुलडाणा येथील साळा नामे शेख राजिक शेख चांद याचेजवळून आणल्याचे सांगितले. त्यावरून शेख राजिक शेख चांद यास ताब्यात घेवून त्याचे घरातून २२ बनावट चलनी नोटा जप्त केल्यात. त्याल शेगाव येथील राहणाऱ्या एका इसमाकडून ७९ बनावट चलनी नोटा मिळाल्या होत्या.

(संपादन - विवेक मेतकर)