esakal | निसर्गाने मारले..मजुरही ऐकेनात...भावातही घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: There will be a lot of work in Rabbi; Labor shortages and falling prices

रब्बीचा हंगाम संपता संपता मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत गेल्याने सरकारला वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागल्याने सर्व जग एका बाजूला थांबले असतांना फक्त शेती व्यवसाय सुरू राहिला. या काळात सर्व व्यवसाय थांबले असतांना शेतीने अर्थचक्र चालवत अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करत निसर्गाच्या दुष्टचक्रात आशेचा किरण मजुरांना दाखविला आहे.

निसर्गाने मारले..मजुरही ऐकेनात...भावातही घसरण

sakal_logo
By
विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : रब्बीचा हंगाम संपता संपता मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत गेल्याने सरकारला वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागल्याने सर्व जग एका बाजूला थांबले असतांना फक्त शेती व्यवसाय सुरू राहिला. या काळात सर्व व्यवसाय थांबले असतांना शेतीने अर्थचक्र चालवत अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करत निसर्गाच्या दुष्टचक्रात आशेचा किरण मजुरांना दाखविला आहे.

मात्र त्याच मजुरांनी आज एकत्र सर्व हंगाम आल्याने त्याच शेतकऱ्याला कात्रीत पकडले आहे. सद्या खरीप हंगामाच्या कामांची शेतीत रेलचेल चालू असून मजुरांची टंचाई भासत असल्याने मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत.

यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातल्याने वेगवेगळ्या टप्प्यात कधी कडक तर कधी दिलासा देणारा लॉकडाऊन पाडल्या जात असल्याने सर्व उद्योग चालू बंद होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येऊन अनेकांनी घरचा मार्ग पकडला आहे.

अशाही स्थितीत गेल्या मार्च महिन्यापासून सुरुवातीला रब्बीच्या हंगामाच्या ग्रामीण भागात तरी अनेकांचा रोजगार हा शेतीतून सुरूच राहिला आहेत. सद्या खरीप हंगामातील पीक काढणी व कापूस वेचणीला सुरुवात झाली असून मका व सोयाबीन सोंगण्यासोबतच कापूस वेचणी सोबत आल्याने मजुरांची एकच कमतरता भासत आहे.

त्यामुळे मजुरांनीही दरात वाढ करून अव्वाच्या सव्वा भाव ठरवून ज्या शेतकऱ्यांनी कठीण काळात मजुरांना तारले त्यांनाच संकटात टाकले आहे.मका सोंगणीचा दर सद्या प्रति एकर साडेतीन हजारांपासून पाच हजारापर्यंत असून कापूस वेचणीसाठी प्रति किलो ६ ते ७ रुपये मोजावे लागत असल्याने या अगोदर अवकाळी व आता मजुरांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.


निसर्गाने मारले..मजुरही ऐकेनात...भावातही घसरण
मागील वर्षीच्या रब्बी सोबत या वर्षीही खरीप हंगाम काढणीच्या वेळेसच वादळी वाऱ्याने थैमान घालून शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान केले.आता कुठे पाणी थांबला व पूर्ण हंगामच काढणीला एकत्र आल्याने मजुरांनी दर वाढविले आहे.एवढे सर्व संकट असतांनाच सद्या सर्व मालाच्या भावात भिजडीच्या नावाखाली घसरण झाली आहे. मका १ हजार,सोयाबीन ३८०० रुपये प्रति क्विंटल तर आता वेचणीतून येणारा नवीन कापूस ३ हजारापर्यंत घेतला जात असल्याने एकप्रकारे सर्वच शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.