दारू पिताना क्षुल्लक वाद, कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 31 October 2020

सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन रेल्वे पुलाजवळ मोनू काकड याची हत्या करण्यात आली. मोनू काकड याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्याकांडात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अकोला ः सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन रेल्वे पुलाजवळ मोनू काकड याची हत्या करण्यात आली. मोनू काकड याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्याकांडात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

न्यू तापडिया नगर परिसरातील चिखलपुरा भागातील रहिवासी मोनू काकड याला धारदार शस्त्र व दगडाने हल्ला करून ठार करण्यात आले. मृतक मोनू काकड याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. दारू पिण्यातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दारू पिताना वाद
दारू पिताना झालेल्या वादातून काकडला त्याच्याच साथिदारांनी दगडाने ठेचून ठार केल्याची माहिती आहे. याआधारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर सुहास वाकोडे आणि ऋषिकेश बाबर या दोन मारेकऱ्यांना अवघ्या काही तापासात ताब्यात घेतले.

आरोपी सुहास, ऋषिकेश आणि मृतक मोनू काकड हे गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारावर या दोघांना अटक करण्यात आली. दारू पिताना झालेल्या क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि त्यातूनच संतापलेल्या सुहास आणि ऋषिकेशने मोनूच्या डोक्यावर दगडाने वार केल्याची माहिती आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A trivial dispute between a notorious gangster