esakal | दिवाळीच्या तोंडावरच नियतीचा डाव! दुचाकीने गावात येत असताना ट्रकने दिली धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: A truck hit while coming to the village on a two-wheeler

शिवाजीनगर येथील ३६ वर्षीय नगिनलाल जैस्वाल हे गावात येत असताना शिवाजीनगर येथील मंदिराजवळ मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते खाली पडून त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली.

दिवाळीच्या तोंडावरच नियतीचा डाव! दुचाकीने गावात येत असताना ट्रकने दिली धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि.बुलडाणा)  ः शिवाजीनगर येथील ३६ वर्षीय नगिनलाल जैस्वाल हे गावात येत असताना शिवाजीनगर येथील मंदिराजवळ मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते खाली पडून त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वारील अन्य एक जखमी झाला आहे.


याबाबतची माहिती अशी की, नगिनलाल वसंतलाल जैस्वाल (वय ३६) रा.शिवाजीनगर हे सकाळी १० वाजता त्यांच्या दुचाकी क्र. एमएच २८ एव्ही ३०४२ ने गावात येत असतांना पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्र.एम.एच. २८ बी-७२०६ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत जैस्वाल हे खाली पडले व त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर असलेला शेख साकीम शेख सरदार रा.पारपेठ हा गंभीर जखमी झाला. त्याला बुलडाणा येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

नगिनलाल जैस्वाल हे शहरातील एका पतसंस्थेत रिकरींगचे काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा आप्त परिवार असून ते शिवाजीनगरचे नगरसेवक अनिल जैस्वाल यांचे भाचे होते.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांनी घटनास्थळी जावून मदत कार्य केले. योगेश भारत जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक बिसमिल्ला खान अमिर खान रा.कुरेशी नगर मलकापूर याचे विरूध्द मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image