शेगाव वरवट रस्त्यावर दोन अपघात तर जळगाव वरवट रस्त्यावर एक अपघात, एक ठार, पाच जखमी

पंजाबराव ठाकरे
Tuesday, 8 December 2020

एकाच दिवशी तालुक्यात दोन ठिकाणी वेगवेगळया जागी अपघात झाल्याची घटना 7 डिसेंबर रोजी घडल्या. यामध्ये एकूण 5 व्यक्ती जखमी झाल्या असून जळगाव जा ते वरवट बकाल आणि शेगाव ते वरवट या रस्त्यावर हे अपघात घडले आहेत.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : एकाच दिवशी तालुक्यात दोन ठिकाणी वेगवेगळया जागी अपघात झाल्याची घटना 7 डिसेंबर रोजी घडल्या. यामध्ये एकूण 5 व्यक्ती जखमी झाल्या असून जळगाव जा ते वरवट बकाल आणि शेगाव ते वरवट या रस्त्यावर हे अपघात घडले आहेत.

7 डिसेंबर चे सकाळी शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर काथरगाव फाट्या जवळ शेगाव आगार च्या बस ला मोटरसायकल स्वार मागून धडकला. या मध्ये मोटरसायकल स्वार पती- पत्नी जखमी झाल्याची माहिती आहे.

. तर दुसऱ्या घटनेत दुपार नंतर जळगाव जा ते वरवट बकाल रस्त्यावर चागेफळ नजीक साइराज बार समोर टिप्पर आणि आर्टिका गाडी चा अपघात झाला .या मध्ये  गिट्टी ने भरलेले टिप्पर खोल मोरी मध्ये  पलटी झाल्याने चालक सह एकजण जखमी झाले.

तर आर्टिका गाडी मधील एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. एम एच-19 सि वाय 1799 क्रमांकाचे टिप्पर गिट्टी घेऊन वरवट बकाल कडे येत होते . तर आर्टिका  एम एच 03- बी डब्लू 5253 ही गाडी जळगाव जा कडे जात असताना अमोरा समोर धडकले. यातील जखमी ना नागरीकांनी बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. 

 
तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले, तरुणाचा मृत्यू..
6 डिसेंबरच्या रात्री शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर वानखेड फाट्यानजीक मोटरसायकल स्वार तरुणाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने गभीर जखमी झालेल्या 22 वर्षीय प्रफुल्ल डोसे (जस्तगाव) नामक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 8 डिसेंबर ला समोर आली. सदर युवक हा रात्री 9 वाजताचे दरम्यान  जस्तगाव  वरून वरवट बकाल जात होता असे सांगितले जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two accidents on Shegaon Varvat road, one accident on Jalgaon Varvat road, one killed, five injured