पुन्हा दोघांचा मृत्यू, 15 पोसिटीव्ह तर 121 कोरोनामुक्त

विवेक मेतकर
Saturday, 3 October 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२१ अहवाल निगेटिव्ह आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, ३ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४३ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७५८९ वर गेली आहे.

दरम्यान, १२१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२१ अहवाल निगेटिव्ह आहेत.

सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये बाळापूर, राजपुतपुरा, अमीनपूरा, बापू नगर, श्रद्धा रेसिडेन्सी कौलखेड रोड, राम नगर, तेल्हारा, पोही लंगापूर, केशव नगर व सातरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी बाळापूर, जूने शहर, निमखेड नगर कौलखेड, मलकापूर व बार्शीटाकळी येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

गीतानगर, रामदासपेठेतील दोघे दगावले
शनिवारी कोरोनावर उपचार सुरु असलेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये गोविंदकुंज अपार्टमेन्ट, रामदास पेठ, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष व गीता नगर, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २२ व ३० सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

१२१ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३२, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून दोन, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ८० अशा एकूण १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१,०२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,५९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६३३० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,०२१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola news : two corona death, 15 positive