अकोला जिल्ह्यात कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 30 November 2020

कोरोना संसर्गाने मृत्यूचे सत्र अकोल्यात सुरूच आहे. शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत २९१ जणांना प्राणास मुकावे लागले. शनिवारी दिवसभरात ३७ नव्या रुग्णांची भर पडली.

अकोला  ः कोरोना संसर्गाने मृत्यूचे सत्र अकोल्यात सुरूच आहे. शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत २९१ जणांना प्राणास मुकावे लागले. शनिवारी दिवसभरात ३७ नव्या रुग्णांची भर पडली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आज दिवसभरात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सायंकाळी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात बार्शीटाकळी येथील ३५ वर्षीय पुरुष असून, तो ता. १३ नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर जऊळखेड खुर्द, ता. अकोट येथील ४५ वर्षीय महिला असून ती २५ नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

६४२ रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ९२९० आहे. त्यातील २९१ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८३५७ आहे. तर सद्यस्थितीत ६४२ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two more killed by corona in Akola district