कोरोनाचे आणखी दोन बळी; ११ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 8 December 2020

 कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने सोमवारी (ता. ७) दोन रुग्णांचा बळी गेला. त्यासह ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतकांची संख्या ३०० झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६४८ झाली आहे.
 

अकोला : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने सोमवारी (ता. ७) दोन रुग्णांचा बळी गेला. त्यासह ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतकांची संख्या ३०० झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६४८ झाली आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या कोविड रोगाने जिल्ह्यात गत नऊ महिन्यांपासून थैमान घातलं आहे. कोरोनाचे सोमवारी (ता. ७) जिल्ह्यात ९१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ११ पॉझिटिव्ह तर ८० अहवाल निगेटिव्ह आले.

याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. संबंधित रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यात पारस ता. बाळापूर येथील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना २१ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते

. दुसरा मृत्यू मांजरी ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. त्यांना ५ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर दोन मृत्यूमुळे आता जिल्ह्यापर्यंत कोरोनाचे ३०० बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यासह ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार ६७७ झाली आहे.

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे सोमवारी (ता. ७) चार अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आदर्श कॉलनी येथील दोन, तर उर्वरित तोष्णीवाल ले-आऊट व खदान येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात पुरुषाचा समावेश असून ते संताजी नगर, खेतान नगर, अकोट, गीता नगर, मोठी उमरी, खदान व कौलखेड येथील रहिवासी आहेत.

१२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सोमवारी (ता. ७) सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९६७७
- मृत - ३००
- डिस्चार्ज - ८७२९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६४८

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two more victims of Corona; 11 new positives