esakal | पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ‘वंचित’तर्फे विरप्पा मोटे
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Virappa Mote from Vanchit for Pandharpur by-election

पंढरपुरचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर समाजातील विरप्पा मधुकर मोटे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. ३१) अकोला येथे पत्रकार परिषदेत केली.

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ‘वंचित’तर्फे विरप्पा मोटे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः पंढरपुरचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर समाजातील विरप्पा मधुकर मोटे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. ३१) अकोला येथे पत्रकार परिषदेत केली.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून सन २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या ता. १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे.

‘वंचित’च्या उमेदवाराची घोषणा बुधवारी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ‘वंचित’ने धनगर समाजातील विरप्पा मधुकर मोटे यांना उमेदवारी दिल्याने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील चुरस वाढली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image