esakal | सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Warning; Chance of rain, officials instructed to stay at headquarters

हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार २३ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधित जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम, अधिक स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. त्यासोबतच एक, दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार २३ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधित जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम, अधिक स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. त्यासोबतच एक, दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

त्यामुळे नागरिकांनी काळणी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


जिल्ह्यातील मोठे, मध्यम व इतर लघु प्रकल्पांमध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा आहे. इतरही प्रकल्पांमधील जलसाठ्यांमध्ये वाढ होत आहे.

प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तरी याबाबत नदीपात्रा शेजारील गावातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यासह संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top