
एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पत्नी व मुलाने धारदार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता.६) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गोशिंग येथे घडली.
मोताळा (जि.बुलडाणा) : एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पत्नी व मुलाने धारदार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता.६) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गोशिंग येथे घडली.
याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे की, बोराखेडी पोलिस ठाण्यांतर्गत गोशिंग येथील ४५ वर्षीय व्यक्तीला दारूचे व्यसन होते. संबंधीत व्यक्ती रविवारी रात्री दारू पिल्याने पत्नी व मुलासोबत भांडण झाले.
या भांडणाच्या कारणावरून मुलाने आईच्या मदतीने स्वतःच्या वडिलांच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.
माहिती मिळताच बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)