esakal | विजेचा धक्का लागून खासगी वायरमनचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Wireman dies of electric shock

विद्युत खांबावर दुरुस्ती करताना वीजप्रवाह सुरूच असल्याने विजेचा धक्का बसून खासगी वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. बळीराम काशिराम वाघमारे वय (वय ५६) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे.

विजेचा धक्का लागून खासगी वायरमनचा मृत्यू

sakal_logo
By
अनिल दंदी


बाळापूर (जि.अकोला) : विद्युत खांबावर दुरुस्ती करताना वीजप्रवाह सुरूच असल्याने विजेचा धक्का बसून खासगी वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. बळीराम काशिराम वाघमारे वय (वय ५६) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे.


बळीराम हा अनेक वर्षांपासून गावात विज जोडणी व दुरुस्तीचे काम करतो. आज सकाळच्या सुमारास गावातील एका व्यक्तीच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे तो खांबावर चढला. खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना तारेत वीजप्रवाह सुरू असल्याने विजेचा प्रचंड धक्का लागून तो जागीच ठार झाला.

विशेष म्हणजे बळीरामचे कुटुंबीय त्याला सोडून बाहेगावी राहत असल्याने तो एकटाच मांजरी येथे राहत होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस घटनास्थळी पोहचले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. या प्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image