
गावात दारूबंदी करण्यात यावी यामागणी साठी बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथील महिलांनी गुरूवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पालकमंत्री बच्चू कडू यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या सुद्धा दिला.
अकोला : गावात दारूबंदी करण्यात यावी यामागणी साठी बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथील महिलांनी गुरूवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पालकमंत्री बच्चू कडू यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या सुद्धा दिला.
बार्शीटाकळी तालुक्यातील शेलगाव येथे दारू विक्री करण्यात येते. त्यामुळे गावातील पुरुष दारू पिऊन महिसांसोबत वाद करतात. त्यासोबत ग्रामस्थांचे सुद्धा एकमेकांसोबत वाद होतात.
काही लोक गावात हाथभट्टीची दारू बनवून विकत असल्याने गावातील सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. ही बाब लक्षात घेवून गावात दारू बंदी करण्याच्या मागणीसाठी गावातील महिलांनी गुरूवारी (ता. १७) पालकमंत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात धडक दिली. यावेळी महिलांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुद्धा केले व दारूबंदीच्या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांच्या नावे दिले.
(संपादन - विवेक मेतकर)