पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा मनपावर घागर मोर्चा

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 25 November 2020

 पावसाळा संपतात शहरातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. त्यात प्रभाग १७ चा समावेश असून, येथील महिलांनी नगरसेविकेच्या नेतृत्वात महानगरपालिका कार्यालयावर घागर मोर्चा काढला.

अकोला :  पावसाळा संपतात शहरातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. त्यात प्रभाग १७ चा समावेश असून, येथील महिलांनी नगरसेविकेच्या नेतृत्वात महानगरपालिका कार्यालयावर घागर मोर्चा काढला.

अकोला शहरातील जुने शहर परिसरात प्रभाग क्रमांक १७ मध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रभागात पाणीपुरवठ्यासाठी असलेली बोअर वेल अनेक दिवसांपासून बंद आहे. शिवाय हातपंपही बंद आहेत.

हेही वाचा अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

याकडे नागरिकांनी वारंवार महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र अद्यापही पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर मनपातर्फे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करण्याची वेळ आली. परिणामी या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका सपना अश्निन नवले यांच्या नेतृत्त्वात महिलांनी मनपावर घागर मोर्चा काढून निषेध नोंदविला.

आयुक्तांना दिले निवेदन
अद्याप उन्हाळा सुरू झालेला नाही. असे असतानाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी घागर मोर्चा काढून महापालिकेत धडक दिली. यावेळी महिलांसह नगरसेविका सपना नवले यांनी आयुक्तांना निवेदन देवून प्रभागातील पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’

प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
अकोला महानगरपालिका क्षेत्रात हातपंप दुरुस्तीची कामे गेले वर्षभरापासून बंद आहेत. एकीकडे मनपा पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करते. त्यातही १०० टक्के घरापर्यंत नळ जोडणी देण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नाही. असे असतानाही शहरातील नादुरुस्त हातपंप दुरुस्तीच्या कामाबाबत महानरपालिका प्रशासन व जलप्रदाय विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

अमृतची कामेही अर्धवट
अकोला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून जलवाहिनी टाकण्याची काम करण्यात आले. पहिल्या टप्प्प्यातील काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळेही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Womens Ghagar Morcha on Municipal Corporation for drinking water