प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’, 36 शिक्षक व 18 कर्मचारी पॉझिटिव्ह

Akola News: Absence of 94% parents and students on the first day of school
Akola News: Absence of 94% parents and students on the first day of school

अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ९वी ते १२वीचे सर्व शासकीय, खासगी शाळांचे वर्ग, वसतीगृह सोमवार (ता. २३) पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सावटात जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक सत्राची पहिली घंटा वाजली.

पहिल्या दिवशी ९४ टक्के पालक व विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास नकारघंटा दर्शविली. त्यामुळे शाळांमध्ये मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. शाळांनी मात्र नियमांचे काटेकोर पालन करत शाळा सुरू केल्याचे दिसून आले. १० हजार ५१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवण्याचे हमीपत्र शाळेला दिले असले तरी पहिल्या दिवशी प्रत्यक्षात केवळ ६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनीच शाळेत हजेरी लावली.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचण्या करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात पार पडली.

सदर चाचण्यांमध्ये काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच शाळा सुरू करण्याचे आदेश शासन व प्रशासनाने दिल्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.

त्यासह विद्यार्थी गोंधळले होते. दरम्यान शाळा सुरू करण्याच्या सर्व चर्चांना जिल्हाधिकारी पापळकर यांनी रविवारी (ता. २२) आदेश जारी केले. त्याअंतर्गत सोमवारी (ता. २३) खबरदारी घेत शाळेची पहिली घंटा वाजली. परंतु कोरोनाच्या सावटात सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशीच्या वर्गांना पालक व विद्यार्थ्यांनी नकार घंटा दाखवली. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच शाळा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी ६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनीच शाळेला हजेरी लावली.

हेही वाचा - VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

३६ शिक्षक व १८ कर्मचारी पॉझिटिव्ह
कोरोनाच्या सावटात शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी (आरटीपीसीआर) करण्यात आली. त्यामध्ये चाचणी करणाऱ्या ३ हजार ५२९ शिक्षकांपैकी ३६ पॉझिटिव्ह तर १ हजार ६२० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास तूर्तास ब्रेक लागला आहे.

  •  स्कुल ऑफ स्कॉलर्सच्या हिंगणा शाखेतील विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत पोहचले नाही. शाळा व्यवस्थापन समितीने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शाळेची पहिली घंटा वाजली नाही.
  • तापडिया नगर परिसरातील भारत विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी पाचच विद्यार्थी पोहचले.
  • महापालिकेच्या शाळा क्रमांक २६मध्ये पोहचलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांचे संमतीपत्र न आणल्यामुळे त्यांना शिक्षकांनी घरी पाठवले.
  • जुने शहरातील मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयातील विद्यार्थीनींची ऑक्सीमिटर तसेच थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. प्रत्येक वर्ग खोलीतील एका बाकावर एकच विद्यार्थीनीला बसवण्यात आले. सर्व विद्यार्थीनींनी हमीपत्र, दोन मास्क, सॅनिटायझनची बॉटल, दोन पाण्याच्या बॉटल व कोणीही टिफिन आणला नाही, याची तपासणी करण्यात आली.

अशी आहे पहिल्या दिवशीची स्थिती
वर्ग विद्यार्थी पटसंख्या पालकांची सहमती उपस्थित विद्यार्थी
९वी २६६७८ ३२०३ १९६६
१०वी २९४४० ४४७७ ३२२५
११वी २५५६० १०३८ ७६८
१२वी २३२९५ १२७४ १००३
--------------------------------------------------------------
एकूण १०६१९९ १००५१ ६९५६

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com