मिनी ट्रॅक्टर उलटल्याने युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

रस्त्याच्या एका वळणावर मिनी ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. गजानन श्रीराम तांबडे (रा. टाकळी नांदखेड) असे मृताचे नाव आहे.

बाळापूर (जि.अकोला)   ः रस्त्याच्या एका वळणावर मिनी ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. गजानन श्रीराम तांबडे (रा. टाकळी नांदखेड) असे मृताचे नाव आहे.

बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या नांदखेड शेतशिवारात पेरणीसाठी जात असताना सदर घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक गजानन तांबडे हा टाकळी नांदखेड शेतशिवारात पेरणी करण्यासाठी मिनीट्रॅक्टर व पेरणीयंत्र घेऊन गेला होता. परत येताना रस्त्यावर त्याचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर त्याच्या अंगावर उलटला.

गजानन तांबडे हा युवक ट्रॅक्टरखाली दाबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बाळापूर पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Youth dies after mini tractor overturns