Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार...
Operation Tiger Shakes Akola Politics

Operation Tiger Shakes Akola Politics

Sakal

Updated on

अकोला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिकेत शिवसेनेने 'ऑपरेशन टायगर' यशस्वी केले असून, उद्धव ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांचा शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत शनिवारी भव्य सत्कार करण्यात आला. "पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी हेवेदावे विसरून एकत्र यावे," असे आवाहन करत बाजोरिया यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीसाठी १५ दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com