esakal | अकोला : पंचायत समितीमध्येही वंचितची सत्ता, १६ जागांनी विजय
sakal

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar

अकोला : पंचायत समितीमध्येही वंचितची सत्ता, १६ जागांनी विजय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येत असलेल्या सात पंचायत समितीच्या पोटनिवडणुकी अंतर्गत मंगळवारी पाच ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 488 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. पोट निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी 68 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 119 उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा: सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय

मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी 6 ऑक्‍टोबर रोजी संबंधित तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी पार पडली. या मतमोजणी प्रक्रिये दरम्यान पंचायत समितीच्या एकूण 28 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 16 जागी निवडून आले आहेत. तर पाच जागी शिवसेना, चार जागी भाजप, एमआयएम, प्रहार व अपक्ष यांना प्रत्येकी एक एक जागा मिळाली.

पंचायत समितीच्या पोट निवडणुकीमध्ये तेल्हारा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला तीन, अकोट तालुक्यामध्ये एक, मुर्तीजापुर तालुक्यामध्ये तीन, अकोला तालुक्यामध्ये तीन, बाळापुर तालुक्‍यामध्‍ये तीन, बार्शीटाकळी तालुक्यामध्ये एक तर पातुर तालुक्यामध्ये दोन जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ड्रग्ज माफीया घरजावई लागतात? राम कदमांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  • अकोला पंचायत समिती निवडून आलेले वंचितांचे सदस्य 3 : एकूण 20 पैकी 11 वंचित. पक्षाचा सभापती होणार.

  • तेल्हारा पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 3 : एकूण 16 पैकी 09 वंचित.पक्षाचा सभापती होणार.

  • अकोट पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य शून्य : एकूण 16 पैकी 07 वंचित.पक्षाचा सभापती ईशवरचिठ्ठी वर विजयी झाला होतो. वंचित ने बहुमत गमावले.

  • बार्शी टाकळी पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 1 : एकूण 14 पैकी 05 वंचित

  • विद्यमान सभापती वंचितचे आहे, सत्ता कायम राहू शकते .

  • पातूर पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 2 : एकूण 12 पैकी 06 वंचित. सत्ता मिळू शकते. शिवसेनेची सत्ता आहे.

  • बाळापूर पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 3 : एकूण 14 पैकी 09 वंचित.सभापती वंचित पक्षाचे आहे. सत्ता कायम.

  • मूर्तिजापूर पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 3 : एकूण 14 पैकी 07 वंचित.

loading image
go to top