
कामगारांना टोचून बोलणे, चिडचिड करणे व नोकरीवरून काढून टाकण्याचे कारण असल्याची माहिती असून, दोन लाखांची रोकड लुटण्यासाठी खून झाल्याचे समजते.
अकोला : खोलेश्वर येथील रहिवासी व्यावसायिक गोपाल हनुमंतप्रसाद अग्रवाल (४५) यांची शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चार गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील अप्पू पॉइंटजवळ घडली होती.
या प्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. संशयित मारेकऱ्यांची चौकशी एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
या घटनेमागे खदानवरील कामगारांना टोचून बोलणे, चिडचिड करणे व नोकरीवरून काढून टाकण्याचे कारण असल्याची माहिती असून, दोन लाखांची रोकड लुटण्यासाठी खून झाल्याचे समजते.
गोपाल अग्रवाल यांच्या बंधूची बोरगाव मंजू येथे गिट्टी खदान आहे. शनिवारी रात्री ते अकोल्याकडे येत असताना त्यांच्यावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी अप्पू पॉइंटजवळ हल्ला केला.
हेही वाचा - नक्षलवादी होणाचा विचार येणे, हे तर राज्यकर्त्यांचे अपयश, सरकारला लाज कशी वाटत नाही?- रविकांत तुपकर
त्यांना अडवल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळी झाडताच अग्रवाल यांनी दुचाकी सोडून पळ काढला; मात्र मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत निर्माणाधीन असलेल्या महामार्गाच्या एका खड्ड्यात त्यांच्यावर पुन्हा गोळी झाडली.
दोन गोळ्या झाडल्यानंतर अग्रवाल यांच्या छातीत एक गोळी तर दुसरी त्यांच्या तोंडात झाडली. त्यानंतरही डोक्यावर दगडाने हल्ला करीत त्यांना जागेवरच मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला;
क्लिक करा - अकोला जिल्ह्यात आज काय विशेष !
मात्र त्यानंतरही जिवंत असलेल्या अग्रवाल यांना काहींनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात आणण्यासाठी गाडीत टाकले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्यांना मृत घोषित केले.
या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, एमआयडीसी पोलिस करीत आहेत. या प्रकरणी अग्रवाल यांच्या खदानमधून काही दिवसांपूर्वीच नोकरीवरून काढलेल्या एका कामगाराचा हात असल्याच्या संशयावरून त्याचा शोध पोलिस घेत आहे.
हेही वाचा - माता न तु वैरणी, पती की बाळ सुरू होती जीवाची घालमेल, मग...
दरम्यान, त्याला या प्रकरणी मदत केल्याच्या संशयावरून चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहितती आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू होती. रविवारी अग्रवाल यांचा मृतदेहाची उत्तरणीय तपासणी करण्यात आली असून, अहवालाची पोलिसांनी प्रतीक्षा आहे.
(संपादन - विवेक मेतकर)