अकोला जिल्ह्यातील पाच ठाणेदारांच्या प्रभारात बदल

अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा ग्राफ गेले काही दिवसांपासून वाढला आहे.
police
policeesakal

अकोला : पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील गुटखा माफियांवर केलेल्या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारींची खांदेपालट केली आहे. त्यात मूर्तिजापूर शहर संजय सोळंके तर रामदासपेठ किशोर शेळके, तर सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचा प्रभार चंद्रशेखर कडू यांच्याकडे तात्पुरत्या सुरुपात पुढील आदेशापर्यंत देण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा ग्राफ गेले काही दिवसांपासून वाढला आहे. त्यातच प्रतिबंधित गुटखा विक्रीही जोमाने सुरू आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेशांतर करीत गुटखा विक्री करणाऱ्यांची पोल खोल केल्यानंतर अकोला पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह लागले होते. त्यानंतरही कामकाजात फारशी सुधारणा झाल्याचे दिसून न आल्याने पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मूर्तिजापूरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त करून अकोला पोलिसांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घातले.

police
सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्ष नोंदणीस प्रारंभ

त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा विषय गांभिर्याने घेत संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारींची खांदेपालट करून अन्य पोलिस स्टेशनच्या प्रभारींनाही इशारा दिला आहे. पोलिस अधीक्षकांनी ता. २८ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशानुसार नियंत्रण कक्षात नियुक्ती असताना सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचा प्रभार असलेले पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांच्याकडे आता मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षातील चंद्रशेखर कडू यांच्याकडे सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचा तर किशोर शेळके यांच्याकडे रामदासपेठ पोलिस स्टेशनचा प्रभार सोपविण्यात आला आहे. रामदासपेठचे प्रभारी अधिकारी नितीन शिंदे यांची आता पोलिस मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक असलेले गजानन गुल्हाने यांची दहशतवाद विरोधी सेल (एटीसी) मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

police
पिंपरी : अवयवदानातून सात जणांना नवजीवन

एपीआयच्या प्रभारींसाठी इच्छुकांची फिल्डिंग

जिल्ह्यात प्रभारी ठाणेदारांवर अकाली बदलीचे संकट कोसळले आहे. त्यात काही एपीआय प्रभारी असलेल्या ठाणेदारांचाही समावेश आहे. त्यासाठी काही इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहरातील एमआयडीसी, माना, दहिहांडासह इतर काही ठाणेदारांचा प्रभार बदलण्याची शक्यता विर्तविली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com