grapes
grapesesakal

सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्ष नोंदणीस प्रारंभ

जिल्ह्यातून युरोपसह अन्य देशांत द्राक्षाची मोठी निर्यात होते.

सांगली : जिल्ह्यातून दर वर्षी सातासुद्रापार द्राक्षाची निर्यात केली जाते. यंदाच्या हंगामातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या वर्षीच्या हंगामात द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यातून युरोपसह अन्य देशांत द्राक्षाची मोठी निर्यात होते. तासगाव आणि खानापूर तालुक्यांतून द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतात. गेल्या वर्षी द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीतही द्राक्ष निर्यातीत वाढच होत आहे. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या काळातही द्राक्ष पिकांना फटका बसला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात केली होती.

त्या वेळी अपेक्षित दर मिळण्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे चित्र होते. गेल्या वर्षी चार हजार शेतकऱ्यांनी नवी नोंदणी आणि नूतनीकरण केले होते. त्याचे क्षेत्र २ हजार ३१६ हेक्टर इतके होते.यंदाच्या हंगामात द्राक्षाची फळछाटणीस उशिरा सुरू झाली. परंतु निर्यातक्षम द्राक्षाची फळछाटणीचे नियोजन शेतकरी करू लागले आहेत. काटेकोर नियोजन आणि गुणवत्ता आणि दर्जेदार द्राक्ष घेण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी माहीर आहेत. द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. यंदा देखील कृषी विभागाकडून जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नूतनीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांत जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाने घेतले आहे. यंदाच्या हंगामात देखील शेतकरी संख्या वाढून क्षेत्रदेखील वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

सन २०२०-२१मधील द्राक्ष निर्यातीची स्थिती


नोंदणी शेतकरी संख्या : ४ हजार २८३
क्षेत्र : २ हजार ३१६ हेक्टर
निर्यात झालेली द्राक्षे : १९ हजार ४९२ टन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com