पोलिस दलाचा सच्चा साथीदार : श्वान पथक

‘बोलके करती गुन्हा; मुके लावती छडा!’
Akola police force Dog squad
Akola police force Dog squad

अकोला : बोलकी माणसे गुन्हे करतात आणि मुके कुत्रे त्याचा छडा लावतात. पोलिसांचे श्वानदल हे त्याचे प्रत्यक्ष प्रमाण. अकोला पोलिस दलात सहा श्वान कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.

अकोला पोलिस दलातील सहा श्वानांपैकी तीन गुन्हे शोधक, एक अमलीपदार्थ शोधक आणि दोन स्फोटके म्हणजेच बॉम्ब शोधक पथकात आहेत. या सहा जणांपैकी चार श्वान (लक्ष्मी, रेवा, झोया आणि ल्युसी) या मादी आहेत तर बॉम्ब शोधक पथकातील दोघे श्वान (रॅम्बो आणि ब्राव्हो) नर आहेत. चार मादी श्वानांपैकी तिघी या डॉबरमन तर एक जर्मन शेफर्ड आणि बॉम्ब शोधक पथकातील दोघे लॅब्रॉडॉर आहेत. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर श्वानांचे सहा ते नऊ महिने कालावधीचे प्रशिक्षण होते. प्रशिक्षण त्यांचे उपजत गुण आणि पोलीस दलात करावयाच्या कामगिरीनुसार दिले जाते. त्यांचे प्रशिक्षण चंदीगड व पुणे येथे झाले आहे. शिस्तीचे पालन, सुचनांचे पालन, वासाचे प्रशिक्षण, माग काढणे इ. प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानुसारच त्यांचे स्पेशलायझेशन ठरते.

अकोला पोलिस दलात अनिल जगताप, भारत ठाकूर, राजू चौधरी, अतुल दुतोंडे, आनंद गायकवाड, किरण अहिर, गोपाल चव्हाण, गणेश महाले, सुनिल सोळंके, संदीप कडेल, विशाल येवतेकर, रविंद्र चोपडे हे या श्वानांचे हॅण्डलर आहेत. या सर्व श्वानपथकाचे नियंत्रक पीएसआय धर्मेंद्र मडावी हे आहेत.

कोल्हापूरची लक्ष्मी, नागपूरची ल्युसी

पोलिस दलात उत्तम जातीवंत हुशार, चपळ श्वानांची निवड केली जाते. शासनाने प्रमाणित केलेल्या श्वान प्रजोत्पादन केंद्रांकडून हे श्वान प्राप्त केले जातात. अकोला पोलिस दलातील लक्ष्मी कोल्हापूर, रेवा पुणे येथून तर झोया अलवर राजस्थान येथून आणि ल्युसी नागपूर येथून आल्या आहेत. रॅम्बो आणि ब्राव्हो हे दोघे सख्खे भाऊ असून, ते अकोल्यातीलच आहेत.

अमली पदार्थ्यांचे सहा गुन्हे उघडकीस

आतापर्यंत लक्ष्मीने पाच, रेवा ने सहा, झोयाने दोन असे गुन्हे तर ल्युसीने अमली पदार्थांशी निवडीत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. रॅम्बो आणि ब्राव्हो हे गेले चार वर्षापासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या दौऱ्यांसाठी आपली सेवा देत आहेत.

स्पर्धा, पारितोषिक आणि सेवानिवृत्ती

पोलिस दल श्वानांच्या कामगिरीची पूर्ण दखल घेते. त्यांच्या स्पर्धाही होतात. त्यांना मेडल्सही दिले जातात. याआधी एका हिरा नावाच्या श्वानास सिल्व्हर मेडल मिळाले होते. आता हिरा सेवानिवृत्त झाला आहे. विशेष म्हणजे, १९९३ पूर्वी श्वानांच्या बदल्याही होत असत. कालांतराने ही प्रथा बंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com