Akola News: ‘सीसीटीएनएस प्रणाली’ अकोला पोलिसांची हॅट्रिक; सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम; २०७ पैकी २०७ गुण मिळवले

Akola Police Retain First Rank in State CCTNS Assessment: २०७ पैकी २०७ गुण! सीसीटीएनएस मूल्यांकनात अकोला पोलिसांची राज्यात अव्वल कामगिरी
Akola Police Achieve Hat Trick in CCTNS Ranking Secure First Position in Maharashtra for Third Consecutive Year

Akola Police Achieve Hat Trick in CCTNS Ranking Secure First Position in Maharashtra for Third Consecutive Year

esakal

Updated on: 

अकोला : पोलिस दलाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, गुन्ह्यांची ऑनलाइन नोंदणी आणि तपास प्रक्रियेत सुसूत्रता राखण्यात अकोला जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) या प्रणालीच्या अंमलबजावणीत अकोला पोलिसांनी सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जुलै २०२६ च्या मूल्यांकनात २०७ पैकी २०७ गुण मिळवत १०० टक्के यश संपादन केले. विशेष म्हणजे, अमरावती परिक्षेत्रातही अकोला पोलिसांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

Loading content, please wait...