मूगावर कोकडा अन् सोयाबीनवर वाणी!, पिकावर फिरवीला ट्रॅक्टर, शेतकरी चिंतेत 

रक्षित बोदडे
Thursday, 6 August 2020

मात्र, दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. मूग पिकाला फुलांचा बार येताच कोकडा रोग आल्याने परिसराती शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हेरावून घेतला, तर सोयीबीनवर वाणीचा रोग आला आहे.

भांबेरी (जि.अकोला) : तेल्हारा तालुक्यात या वर्षी वेळेवर पाऊसाला झाली. यामुळे शेतकऱ्यांनी वेळेतच पेरणी आटोपून घेतली. आवश्यकते नुसार पाऊस होत असल्याने शेतात विविध प्रकारची पीकं डोलत होती.

मात्र, दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. मूग पिकाला फुलांचा बार येताच कोकडा रोग आल्याने परिसराती शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हेरावून घेतला, तर सोयीबीनवर वाणीचा रोग आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तालुक्यातील भांबेरी, मनब्दा, अटकळी, निंबोळी, दापुरा, खापरखेड, दहिगाव,आडसुळ, उबारखेड, खेलदेशपांडे, पंचगव्हाण, नेर, मनात्री,जस्तगाव, टाकळी, पाथर्डी, थार, शेरी, माळेगाव, बेलखेड, गोर्धा, तळेगाव, रायखेड, कोठा यासह बऱ्याचशा गावातील नागरिकांनी उभ्या मूग पिकावर चक्क ट्रॅक्टर फिरवला तर सोयाबीनचे सुद्धा देव जाणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आम्ही तक्रार देऊ, तुम्ही काय आयत्या पिठावर रेगाेट्या ओढणार काय, जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला युरीया घोटाळा

सोयाबीन पिकावर वाणीने मोठ्या प्रमाणात आक्रमक करून पानं पोखरण्यास सुरवात केली आहे हे पिक सुद्धा हातचे जाते कि काय?यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. कोरोना संकटात शेतकऱ्यांना सुद्धा व्याज बट्याने पैसे काढून पेरणी करावी लागली.

Video : अरे हे काय ! बहिणीने भावाला राखी बांधायच्या ऐवजी; बहिणीनेच भावाचा व्यवसाय केला उध्दवस्त

खर्चसुद्धा निघू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाने तत्काळ पीक पाहणी करून सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

परिसरातील मूगाच्या पिकावर कोकडा आला आहे. यामुळे हे पीक हातचे गेले. यामुळे काही शेतकऱ्यांनी चक्क उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवीला आहेय. सोयाबीनवर सुद्धा वाणी मोठ्या प्रमाणात आली असून, पानं पोखरत आहे.
- गोपाल दातकर, शेतकरी, भांबेरी

मूग पिकाच्या नुकसान भरपाईसाठी गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार यांचे संयुक्त पत्र आम्ही राज्य शासनाला पाठविले आहे. सोयाबीन पिकावर आलेल्या कीडी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी कृषी अधिकारी यांना सूचना देतो.
- राजेश सुरळकर, तहसीलदार, तेल्हारा
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola raisins on cockroaches and soybeans, tractors on crops, farmers worried