Akola : कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला उदंड प्रतिसाद

शेतकऱ्यांनी जाणून घेतले कृषीचे नवतंत्रज्ञान; तज्ज्ञांनी केले शंकांचे निरसन
akola news
akola newsesakal
Updated on: 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसीय शिवार फेरी कार्यक्रमाची गुरुवारी (ता.२०) सांगता झाली. तिसऱ्या दिवशी वाशीम, अमरावती, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी शिवार फेरीच्या नियोजित स्थळी भेट दिली असून, तीन दिवसात संपूर्ण विदर्भातून शिवार फेरीला १० हजार शेतकऱ्यांनी उपस्थित राहून विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले.

akola news
Akola : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष गौरव पुरस्कार

कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शेतकऱ्यांच्या वाहनांना शिवार फेरीसाठी रवाना करण्यात आले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या हस्ते प्रशासकीय भवनासमोरील प्रांगणात ध्वजारोहण व विद्यापीठ गीताने विद्यापीठ स्थापना दिन साजरा करण्यात आला.

akola news
Akola : श्री शिवाजी महाविद्यालय नॅकमध्ये ‘ए डबल प्लस’

याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. व्ही.के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे आदिंची उपस्थिती होती. शिवार फेरीदरम्यान विद्यापीठ कार्यकारणी सदस्य विठ्ठल सरप व डॉ.व्ही.के. माहुरकर, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे (अमरावती) व राजेंद्र साबळे (नागपूर) तसेच कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

akola news
Akola : शिक्षकांच्या वेतनात अनुदानाचा अडथळा!

कृषी महाविद्यालय अकोलाच्या के.आर. ठाकरे सभागृहात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत आयोजित चर्चासत्रादरम्यान विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. चर्चासत्रा दरम्यान डॉ. शंभरकर यांनी सूत्रसंचालन केले तर, डॉ. राजेश्वर काटोले, डॉ. उमेश चिंचमलातपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

akola news
Akola : सव्वा दोन लाख क्विंटल हरभरा बियाणे

शिवारफेरीदरम्यान विद्यापीठ निर्मित पीकेव्ही हाय २, पीकेव्ही जे.के.ए.एल. ११६ बिजी २, सुवर्ण शुभ्रा, एकेएच ९९१६, एकेएच ८८२८ या अमेरिकन वाणांची तसेच एएचएच ०८१ बीटी, रजत बीटी या सुधारित वाणांचा तर, देशी वाणांमध्ये एके ७, एके ८८०१ या वाणांचे सुधारित लागवड तंत्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दाखवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com