अकाेला : सुरक्षेचा तिसरा डोळा झाला पांगळा

सिग्नलसोबतच सीसीटिव्ही यंत्रणा धुळखात, वाटमारीच्या घटनांमध्ये वाढ
Akola road signal bad condition along with CCTV system
Akola road signal bad condition along with CCTV systemsakal

वाशीम : लाखो रूपये खर्च करून शहरात बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याआधीच आजारी झाली असताना शहराच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंदच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संवेदनशील भागातील सुरक्षा यामुळे वाऱ्यावर आहे. भरदिवसा लुटारू नागरिकांना लुटत असताना ही यंत्रणा कार्यान्वित का केली जात नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशीम शहराची संवेदनशील शहर म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे. शहरातील काही भागात प्रचंड वर्दळ असते, ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी शहरातील महत्वाच्या चौकात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून घेतली होती. यामुळे शहरातील दहा ठिकाणच्या हालचाली वाशीम शहर पोलिस ठाण्यात व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात टिपल्या जात होत्या. याच सीसीटिव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा छडा लागला होता. तसेच असामाजिक तत्वावर वचक निर्माण झाला होता. मात्र दोन वर्षापासून ही यंत्रणाच आजारी पडली आहे.

एखादे वेळी बाजारपेठेत गुन्हा घडला तर पोलिसांना व्यापारी प्रतिष्ठानातील सीसीटिव्हीचा आधार घ्यावा लागत आहे. चार दिवसापूर्वी वाशीम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटणी चौक रस्त्यावर एका वृद्धाला लुटल्याची घटना दिवसाढवळ्या घडली. सीसीटिव्ही बंद असल्याने चोरटे निर्धास्त तर नागरिक भयभीत आहेत.

चौकशी होणे गरजेचे

शहरात सिग्नल यंत्रणेबरोबरच सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यासाठी ऐंशी लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. मात्र एवढा खर्च करूनही दीड वर्षापासून ही यंत्रणा बिघाडलेली आहे. कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची बाब समोर आली आहे. सिग्नल यंत्रणेचे खांब अनेकवेळा कोसळले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.

ठाण्यासमोरच सिग्नलने फिरविले तोंड

शहरात कंत्राटदाराने बसविलेले सिग्नल व सीसीटिव्ही यंत्रणा किती तकलादू आहे, याचा नमुना येथील शहर पोलिस ठाण्यासमोरच दिसतो. येथील सिग्नलच्या खांबाने पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीकडे तोंड फिरविले आहे. चौक एकीकडे तर सिग्नलचे तोंड दुसरीकडे अशी अवस्था चौकाचौकात असताना यंत्रणा ढिम्म आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com