akola स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटले

Akola : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किनगावराजा (जि. बुलडाणा) : येथून जवळच असलेल्या ग्राम जऊळका शिवारात बोलावून व कमी किमतीमध्ये सोने देतो असे सांगत चाकूचा धाक दाखवीत व काठ्यांनी मारहाण करून तब्बल ६ लाख रुपयांची रोख रक्कम व ९० हजार रुपये किमतीचे अंगावरील सोने,चांदी आणि मोबाईल लुटल्याची घटना ९ नोव्हेंबरला घडली. याबाबत फिर्यादीने किनगावराजा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. घटनेतील आरोपी फरार झाल्याने पोलिसांकरवी त्याचा शोध सुरू आहे.

किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी विकास सुभाष मंडपे वय ३३ वर्षे राहणार गोसावीवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यास आरोपी बालाजी किसन मोहिते राहणार सुकापूर जिल्हा हिंगोली याने सुभाष मंडपे यांना कमी किमतीत सोने देतो असे आमिष दाखवून ९ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्याच्या मित्रांना सिंदखेडराजा येथे बोलावले व तेथून त्यानंतर त्यांना जउळका शिवारात बोलावून घेतले.

हेही वाचा: कोथरुड : वंचितांसाठी काम करणारांचा सन्मान

परंतु, त्याठिकाणी सोने न देता श्री. मंडपे व त्यांचे मित्रांना चाकूचा धाक दाखवून तसेच काठ्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील नगदी रोख ६ लाख रुपये तसेच गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी व दोन मोबाईल असा एकूण ६ लाख ९० हजार रुपयाचा माल व बॅगमधील कागदपत्रे घेऊन पळ काढला. या घटनेनंतर श्री. मंडपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन सदर घटना सांगितली. श्री. मंडपे यांच्या तोंडी रिपोर्टवरून आरोपी बालाजी किसन मोहिते याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे व पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक चाटे करीत आहे.

loading image
go to top