वाळू तस्करांची चक्क नायब तहसीलदारांनाच धक्काबुक्की, दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Akola Sangrampur News Sand smugglers push Deputy Tehsildar, charges filed against two accused
Akola Sangrampur News Sand smugglers push Deputy Tehsildar, charges filed against two accused

संग्रामपूर (जि.बुलडाणा)  ः वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायब तहसीलदाराला धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यादरम्यान ता.९ आगस्टचे सायंकाळ घडली.

यामध्ये कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टर चालकाने नायब तहसीलदार समोर ट्राली मधील रेती टाकून देऊन पोबारा केला. याबाबत नायब तहसीलदार प्रवीण वराडे यांनी तामगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. यातील दोन जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

रविवारी संध्याकाळी वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावरील कला वाणिज्य महाविद्यालया समोर सिनेस्टाईल हा प्रकार घडल्याचे अनेकांनी बघितले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संग्रामपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे यांना रविवारी संध्याकाळी वरवट बकाल संग्रामपूर रस्त्याने वाळू वाहतूक करणारे विना नंबरचे ट्रॅक्टर दिसून आले.

रेती वाहतुकीचा परवाना आहे का, याची तपासणीसाठी वराडे यांनी ट्रॅक्टर अडविले. त्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती होती. तपासणी दरम्यान संग्रामपूर येथील शिवा राजनकारने घटनास्थळावर येऊन नायब तहसीलदारासोबत हुज्जत घातली व धमकी देऊन धक्काबुक्की करीत पकडलेले विना नंबरचे ट्रॅक्टर चालकाला पळून नेण्यास सांगितले.

अनोळखी वाहनचालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. या प्रकरणी नायब तहसीलदार यांनी तत्काळ तामगाव पोलिस स्टेशनला जाऊन घडलेल्या घटनेची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवा राजनकार व अनोळखी वाहनचालक या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत तामगाव पोलिस स्टेशनला तहसीलदार शिवाजी मगर व उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com