
अकोला : आगामी २६ जानेवारी रोजी भारत आपला ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यानिमित्त दिल्लीत नेत्रदीपक परेड होणार असून यंदाच्या परेडमध्ये अकोल्यातील महापालिकेतील सफाई कर्मचारी अनिल हरी खोडे यांचा मुलगा आनंद अनिल खोडे व दुसऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा सुमित पथरोड सहभागी होणार आहे.