
अकोला : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र, अशा समारंभांमध्ये वापरले जाणारे पिण्याचे जारचे पाणी आणि मान्सूनपूर्व आलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक नागरिकांना पोट बिघाडाचा त्रास जाणवत असून, गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सलंग्नित सर्वोपचार रुग्णालयात लूझ मोशन, उलट्या आणि डायरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.