अकाेला : जुगार अड्ड्यावर कारवाई

१२ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Akola Shirpur Police raid gambling place 12 lakh 62 thousand confiscated
Akola Shirpur Police raid gambling place 12 lakh 62 thousand confiscatedsakal

शिरपूर : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पिंपरी सरहद येथे जून दोन रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक शाखा वाशिमच्या चमूने जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई करत तब्बल १२ लाख ६२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पिंपरी सरहद इथे मोठ्याप्रमाणावर जुगार अड्डा चालत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शाखा वाशीम यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर चमूने दिनांक सात जून रोजी २०२२ संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान जुगार अड्ड्यावर सापळा रचून धाड टाकली. त्यावेळी जुगार खेळत असलेल्या १५ आरोपीना ताब्यात घेण्यात आले.

आरोपीतांच्या ताब्यातून ८२,२३० रु नगदी रोकड तसेच एकूण ९ दुचाकी वाहन किंमत ५,२०,००० रुपये व एक चारचाकी मारोती सुझुकी डिझायनर किंमत ६ लाख रुपये,१३ मोबाइल एकूण किंमत ५७,५००रुपये, ५२ ताश पत्याचे ६ बॉक्स किंमत अंदाजे ३ हजार रुपये ,असा एकूण १२ लाख ६२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी व मुद्देमाल शिरपूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला.

फिर्यादी सपोनि भारत लसंते अप्पर पोलीस अधीक्षक शाखा वाशिम यांच्या फिर्यादीवरून पंधरा ओपीम विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने सपोनि भारसाकळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

गोरगरिबांनी कमावलेला कष्टाचा पैसा जुगार यासारख्या व्यसनामध्ये जात असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. घरचा कर्ता पुरुष व्यसनाधीन झाल्याने कुटंबातील चिमुकल्यावर प्रसंगी उपासमारीची वेळ सुद्धा येते. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षकाच्या चमूने केलेल्या कारवाईचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com