लॉकडाउनमुळे बहिणींचा हिरमोड, रक्षाबंधनच्या एक दिवस आधी टाळेबंदीमुळे बाजारात सन्नाटा

सुगत खाडे  
Monday, 3 August 2020

‘रक्षाबंधन’ हा बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. त्यासाठी रक्षाबंधनच्या एक दिवस आधीपर्यंत बहिणी बाजारात जावून विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी करतात.

अकोला   ः ‘रक्षाबंधन’ हा बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. त्यासाठी रक्षाबंधनच्या एक दिवस आधीपर्यंत बहिणी बाजारात जावून विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी करतात.

त्यामुळे बाजारपेठ सुद्धा फुलून जाते; परंतु यावर्षी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधी रविवारी (ता. २) जिल्ह्यात एक दिवसासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्याचा विपरीत परिणाम राखी व इतर साहित्याच्या खरेदीवर झाला असून राख्या न खरेदी करणाऱ्या बहिणींचा हिरमोड झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जुलै महिन्याच्या अखेरीस सण, उत्सवांना सुरुवात होते. याच वेळेत श्रावण महिन्याला सुरुवात सुद्‍धा होते. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. बाजारपेठ सुद्धा प्रासंगिक क्षणांसाठी लागणाऱ्या साहित्यांनी फुलून जाते. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने सण, उत्सवावर विघ्न आलेले आहे. त्यामुळे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार व नागपंचमी सुद्धा कोरोनाच्या सावटातच साजरी करण्यात आली.

भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली राखी पौर्णिमा घरातच साजरी करावी लागत असल्याने त्यावर कोरोना महामारीचा परिणाम कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; परंतु मिशन बिगीन अगेन अंतर्गत टाळेबंदी शिथिर करत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ३१ जुलै) आदेश जारी करुन आॅगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवारी टाळेबंदी लागू करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे सोमवारी (ता. ३) साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या खरेदीवर सुद्धा विघ्न आले. साधारणतः रक्षाबंधनच्या एक दिवस आधी राखी व इतर साहित्य खरेदीसाठी फुलून जाणाऱ्या बाजारपेठेत सन्नाटा पाहायला मिळाला. त्यामुळे बहिणींच्या उत्साहावर सुद्धा पाणी फेरल्या गेले.

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासासमोर राखी विक्रीचे दुकान
रक्षाबंधनच्या एक दिवस आधी अकोल्यात रविवारी (ता.२) पूर्ण लॉकडाउन करण्यात आले. संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र ती झुगारून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निवास स्थानापुढे गेट समोर राखीचे दुकान लावून लॉकडाउनचा निर्णय अमान्य करीत निषेध नोंदविला. व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलिस दादागिरी करीत दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचं तसेच दंड लावत असल्याचे समजल्याने हे प्रतिकात्मक दुकान लावून निषेध करण्यात आला. यावेळी वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, गौतम गवई, कलिम खान, राजेश तायडे, सचिन शिराळे, उमेश गोपणारायण, अतुल तेलमोरे, समीर भोजने, मुन्ना तायडे, अनवर शेरा, आकाश गवई आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Sisters hilarity due to lockdown, lockout a day before Rakshabandhan