esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहल चव्हाण

अकोला : स्नेहल चव्हाण आंतरराष्ट्रीय परिषदेत अव्वल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सेंटर फॉर प्लांट ब्रीडिंग आणि जेनेटिक्स, तमिळनाडू कृषी विद्यापीठ येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी स्नेहल विनय चव्हाण हिने प्रथम पारितोषिक पटकावून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. या उत्तुंग यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तमिळनाडू कृषी विद्यापीठ येथे दिनांक 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी स्नेहल विनय चव्हाण हिने ‘सूक्ष्म पोषक कुपोषण रोखण्यासाठी संभाव्य ज्वारीच्या रेषांची मॉर्फो जैवरासायनिक तपासणी’ या विषयावर तोंडी शोध प्रबंध सादरीकरण केले. त्यासाठी तिला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला देश-विदेशातील अनेक शास्त्रज्ञ उपस्थित होते.

हेही वाचा: मुंबई : महाराष्ट्र बंदला डबेवाल्यांचा पाठिंबा

स्नेहलने हे पारितोषिक पटकावून अकोला जिल्ह्याच्या आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. तिच्या या कर्तृत्वासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, अधिष्ठाता कषी डॉ. महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. आर. एम. गाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. बी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख डॉ. आर. बी. घोराडे आणि समस्त विद्यापीठ परिवाराने कौतुक केले आहे.

स्नेहल विनय चव्हाण हिने याआधीही विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. ३३ व्या दीक्षान्त समारंभात तिने सर्वाधिक ९ पारितोषिके पटकविले होते. तिला इतर अनेक परिषदेत विविध पारितोषिके प्राप्त झालेले आहेत. स्नेहल ही वनस्पतीशास्त्र विभाग येथे पीएचडी (वनस्पतींचे प्रजनन आणि आनुवंशिकता) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. सध्या ती डॉ. आर. बी घोराडे, विभाग प्रमुख कृषी वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीचे संशोधन कार्य करीत आहे.

loading image
go to top