अकोला : आधुनिक शेतीत सुधारित वाणांचा वापर वाढल्याने पिकांचे उत्पादन वाढले असले, तरी माती व पाण्याचा तीव्र वापर, तसेच असंतुलित खत व्यवस्थापनामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात मोठी घट झाल्याचे दिसून येते..अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील जमिनीचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, त्यातून चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे..डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागात अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प राबवला जात असून, त्याअंतर्गत विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ. संदीप हाडोळे, प्रशांत सरप, श्याम जाधव यांनी हा अभ्यास केला. जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मूग पिके घेतली जातात. तर रब्बीत गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल ही प्रमुख पिके घेतली जातात. अलीकडे शेतकरी डाळिंब, पेरू, सीताफळ अशा फळपिकांकडे वळत आहेत. मात्र, जिल्ह्यातील ४३.५ टक्के जमीन हलकी, ९.९ टक्के जमीन मध्यम काळी तर ४६.६ टक्के जमीन भारी काळी आहे. जिल्ह्यात १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र क्षारयुक्त व चोपण जमिनींमध्ये मोडते..एकूण ३२४ मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करण्यात आली. अहवालानुसार जमिनीचा सामू ६.८६ ते ८.९८ दरम्यान असून, जवळजवळ ९६ टक्के जमिनींमध्ये चुनखडीचे प्रमाण ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे स्फुरदाचे स्थिरीकरण होऊन त्याची उपलब्धता घटते..मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र आणि स्फुरदाची तीव्र कमतरता जवळपास सर्वच जमिनीत आढळून आली. नत्र या मुख्य अन्नद्रव्याचे प्रमाण जिल्ह्यात ३७.६३ ते ३२६.१४ किलो हेक्टरी इतके आढळले असून नत्राची कमतरता सर्वात जास्त अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोला, मूर्तिजापूर, पातूर या तालुक्यात आढळून आली. स्फुरदाचे प्रमाण जिल्ह्यात १४.४६ ते ६२.६७ किलो हेक्टरदरम्यान आढळले असून, त्याची कमतरता अकोट, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोला, तेल्हारा, पातूर तालुक्यात ९३.८३ टक्के आळळले. पालाशची कमतरता काही तालुक्यांमध्ये दिसून आली..दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये गंधकाची कमतरता तब्बल ५० टक्के क्षेत्रात असून, बार्शिटाकळी, पातूर व अकोट, तेल्हारा येथे ती सर्वाधिक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जस्त, लोह व बोरॉनची कमतरता गंभीर असून, अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर या तालुक्यांत जस्ताची कमतरता ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. लोहाची कमतरता तेल्हारा व अकोटमध्ये अनुक्रमे ९५ व ९३ टक्क्यांपर्यंत नोंदली गेली..Shahapur tourism: पर्यटनातून शहापूरची विकास झेप .तज्ज्ञांनी सूचवलेल्या उपाययोजनाअकोला जिल्ह्याच्या जमिनीतील वाढत्या सामूवर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित खत पुरवठा गरजेचा आहे. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार व्यवस्थापनाची गरज आहे. शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत यांचा नियमित वापर केल्याने चुनखडीचा दाह कमी होऊन अन्नद्रव्ये उपलब्धतेस फायदा होतो. क्षाराचे प्रमाण मर्यादेत ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर, पाणी तपासणी करून सुधारित सिंचनाचा वापर, तसेच निचरा सुधारण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. नत्र, स्फूरदाची सर्वच क्षेत्रातील कमतरता या दृष्टीने जमिनीची सुपीकता जोपासण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. यात माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित आणि एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनानुसार वापर गरजेचा आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.