अकोला : रेशन कार्डच्या हजारो तक्रारींचा निपटारा

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार राबविलेले विशेष अभियान
Akola Special campaign by Guardian Minister for ration card complaints
Akola Special campaign by Guardian Minister for ration card complaintssakal

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निर्देश दिल्यानुसार जिल्ह्यात ११ एप्रिल ते १५ मे तसेच त्याआधी २५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव व रेशनकार्ड संदर्भात तक्रारींचा निपटारा करण्याचे विशेष अभियान राबविण्यात आले. अभियानांमध्ये अनुक्रमे १३ हजार ७२ व १४ हजार ५९९ असे एकूण २७ हजार ६७१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना शिधापत्रिका मिळणे व त्यासंदर्भातील अन्य कामे जसे नावे वगळणे, नावे समाविष्ट करणे, शिधापत्रिका विभाजन करणे हे सहजरित्या व्हावे यासाठी रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव हे अभियान राबविण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने २५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत रेशनकार्ड संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष अभियान राबविले.

जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकांची संख्या ३ लाख २५ हजार ११५ आहे. कुटुंबातील नावे कमी होणे, नवीन सदस्य कुटुंबात येणे, कुटुंबांचे विभाजन होऊन नव्या शिधापत्रिकेची आवश्यकता भासणे, स्थलांतरामुळे नव्या ठिकाणी शिधापत्रिका स्वस्त धान्य दुकानाला जोडणे अशा प्रकारची कामे प्रशासनाकडे जाऊन करावी लागतात. त्याबाबत या कामांचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून विशेष अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात एकाच वेळी रेशनकार्ड तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. अभियानामध्ये दिव्यांग व्यक्ती, अनाथ व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्तव्यक्ती अशांना प्राधान्याने शिधापत्रिका देऊन लाभ देण्यात आला.

असे राबविले अभियान

२५ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत २ हजार १८० नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या. ६ हजार ६३३ दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या. २ हजार ९५४ प्रकरणी शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करण्यात आले. २ हजार ५०० प्रकरणात शिधापत्रिकेतील नावे कमी करण्यात आली. तब्बल १४ हजार ५९९ कार्डधारकांच्या तक्रारींचा निपटारा या अभियानात करण्यात आला.

११ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव या अभियानात जिल्ह्यातील ८८३ गावांपैकी ६८६ गावांमधून तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यात ८ हजार ६१६ जणांना दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या. २ हजार ३७० प्रकरणांत शिधापत्रिकेतील नावे समाविष्ट करण्यात आली. २ हजार ८६ प्रकरणात शिधापत्रिकेतील नावे वगळण्यात आली. अशी एकूण १३ हजार ७२ प्रकरणांवर कारवाई पूर्ण झाली. दोन्ही अभियानात मिळून २७ हजार ६७१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com