अकोला, तेल्हारा पं. स. सभापतींची निवडणूक आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला, तेल्हारा पं. स. सभापतींची निवडणूक आज

अकोला, तेल्हारा पं. स. सभापतींची निवडणूक आज

अकोला : अकोला व तेल्हारा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उद्या दोन्ही पंचायत समितींमध्ये सभेचे आयोजन केले आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडेल. दुपारी ३ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडेल. वंचितकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ असल्याने दोन्ही पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांसह ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या इतर सदस्यांचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक घेवून नामाप्र अर्थात ओबीसीच्या प्रवर्गासाठी राखीव जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या. दरम्यान पोटनिवडणुकीनंतर तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींची निवड कोणत्या प्रवर्गातून करण्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यामुळे अकोला पंचायत समितीच्या सभापतींचे निवड नामाप्र तर तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतींची निवड नामाप्र महिला प्रवर्गातून करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापतींचे पद नामाप्र प्रवर्गातून भरण्यात येतील.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

वंचितचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. २० सदस्य संख्या असलेल्या अकोला पंचायत समितीमध्ये वंचितचे ११ तर तेल्हारा पंचायत समितीमधील १६ पैकी ९ सदस्य वंचितचे आहेत. तर कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्य उज्ज्वला काळपांडे यांनी १८ नोव्हेंबर रोजी वंचितमध्ये प्रवेश केल्याने आता वंचितची सदस्य संख्या दहा झाली आहे.

loading image
go to top