आज ‘संडे लॉकडाउन’!

विवेक मेतकर
Sunday, 30 August 2020

जिल्ह्यात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आले आहे. सम-विषम पद्धती रद्द करण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात प्रत्येक शनिवारी रात्री ७ वाजतानंतर सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आले आहे. सम-विषम पद्धती रद्द करण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात प्रत्येक शनिवारी रात्री ७ वाजतानंतर सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी पापळकर यांनी जारी केलेल्या सदर आदेशाचा ३० ऑगस्ट शेवटचा दिवस असल्याने यानंतर प्रत्येक रविवारी लॉकडाउन सुरू राहिल अथवा नाही यासंंबंधी शासनाच्या सूचना मिळाल्यानंतरच जिल्हा प्रशासन निर्णय घेईल.

हेही वाचा- या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?.

जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोग्यांची संख्या वाढत आहे. रुग्णांनी तीन हजार ८०० रुग्णांचा
टप्पा ओलांडला असून मृतकांची संख्या सुद्धा दीडशेपर्यंत गेली आहे. शहरांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे.

बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असल्यामुळे व विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्‍यकता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियमांतर्गत जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजेच ९, १६, २३ व २० ऑगस्टरोजी संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली. ३० ऑगस्टरोजी सुद्धा टाळेबंदी लागू राहिल, परंतु त्यानंतर टाळेबंदीसंदर्भात प्रशासन निर्णय घेईल.

रेशन दुकानदारांचे कमिशन सरकारी तिजोरित!
 
या बाबी राहतील सुरू
- दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहिल.
- सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
- सर्व औषधांची दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपूर्ण कालावधी करता सुरू राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola today Sunday lockdown