अकोला : ‘दव’ पडत असल्याने तूर, हरभरा पीक धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop

अकोला : ‘दव’ पडत असल्याने तूर, हरभरा पीक धोक्यात

तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यात दोन-तीन दिवसाआधी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये शेतात सकाळी दव पडत असल्याने हरभरा, तूर पीक धोक्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यात यंदा सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने पेरणी उशिरा करण्यात आली. त्यामुळे मूग, उडीद पिकांवर बेंडक्या आल्याने सदर पीक मातीमोल झाले. तर, सोयाबीन एकरी एक ते दीड क्विंटल उत्पादन झाले.

काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात ट्रॅक्टर फिरवून त्यामध्ये हरभरा पेरणी केली. तर, काहींनी तूर पीक कायम ठेवले. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम व दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे काही गावांमध्ये पाऊस आल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने हरभरा पिकांवर मर रोग येत आहे. तर, तूर पिकांचे फुले गळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधिच पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, तिळ हे पीक शेतकऱ्यांचे हातून गेले आहेत. मात्र, तरीही शेतकरी हिम्मत न हारता हरभरा, तूर पिकांवर मोठ्या आशेने उत्पादन वाढावे म्हणून खर्च केला. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे आता या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हेही वाचा: एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

"मी, पाच एकरात उडीद पेरणी केली होती मात्र, ऐन सोगंणीच्या वेळी पाऊस आल्याने उडीद पिकांचे शेंगा गळून पडल्याने शेतात रोटावेटर फिरवून आता हरभरा पेरणी केली आहे. मात्र, दोन दिवस आधी आलेल्या पावसामुळे आता हरभरा पिकांचेही नुकसान होताना दिसत आहे."

- सुबोध राऊत, शेतकरी, तळेगाव बाजार

"ढगाळ वातावरणमध्ये तूर पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी कर्बेनडेझीन एक ग्रॅम किंवा डायथेन एम २.५० ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी."

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

loading image
go to top