एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा होणार सुरू | Schools | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

मुंबई: आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) राज्यातील प्राथमिक शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा (School) सुरू करण्यासाठी टास्क फोर्सने (Task force) ग्रीन सिग्नल दिला होता. आता सरकारनेही मान्यता दिली आहे.

येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील सगळ्या प्राथमिक शाळा सुरू होणार होणार आहेत. एक डिसेंबर पासून पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. "मागील काळात आम्ही मोठी खबरदारी घेतली होती. ही सर्व मुले छोटी आहेत. पण तरीही या मुलांना शाळेत आणणे महत्वाचे आहे. टास्क फोर्सशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत" असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा: 'समीर वानखेडेंनी दफनविधीवेळी आईचा मुस्लिम धर्म दाखवला'

"निवासी शाळाबाबत आम्ही लवकर निर्णय घेऊ. दिवाळीनंतर काय परिस्थिती आहे हे पाहून आम्हीहा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी पूर्ववत जीवनात यायला हवेत म्हणून आम्ही आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचा निर्णय आल्यानंतर आम्ही या शाळा सुरू करत आहोत" अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा: "भाजप-जेजेपी-आरएसएसच्या लोकांनी लग्नाला येऊ नये"; लग्नपत्रिका व्हायरल

"तिसऱ्या लाटेवर आमची नजर होती. मात्र परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेतला आहे. भविष्यात काही कार्यक्रम देखील घेणार असून, मुलांची काळजी घेतली जाईल. मुख्यमंत्री व्हीसीद्वारे कॅबिनेटमध्ये आले होते. त्यांची तब्येत लवकर सुधारावी अशा माझ्या शुभेच्छा आहेत. लवकरच मुख्यमंत्री आपल्या सर्वांना भेटतील" असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

नियम पाळून शाळा सुरू करायला हरकत नाही, असं टास्क फोर्सचं म्हणणं होतं. खेळांना परवानगी देणार की नाही, त्याबाबत अजून स्पष्टत नाहीय. लांब राहून खेळता येणाऱ्या मैदानी खेळांनाही परवानगी देण्यात येईल. क्रिकेट, धावण्याची शर्यतीला परवनगी असेल. पण खो खो कब्बडीला परवानगी मिळणार नाही. चाईल्ड टास्क फोर्सच्या बैठकीत डॉक्टरांचं एकमत झालं होतं. गतिमंद मुलांच्या शाळाही नियम पाळून सुरू करायला हरकत नसल्याचं टास्क फोर्सचं मत आहे.

loading image
go to top